शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल शॉपी फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत; ८१ मोबाईलसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By राजन मगरुळकर | Updated: May 27, 2025 13:22 IST

परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथे केली कारवाई

परभणी : शहरातील वसमत रोडवर असलेल्या ‘एसएस मोबाइल शॉपी’मध्ये २२ मे रोजी मध्यरात्री झालेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८१ मोबाइल, साउंड बार आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण २१.२० लाखांचा मुद्देमाल सोमवारी जप्त करण्यात आला आहे. 

परभणी शहरातील मोबाइल शॉपी फोडल्याप्रकरणी गुन्हा नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या गुन्ह्याचा तपास स्थागुशाकडे सोपवून उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने तपास सुरू केला. यासाठी पथकाला मिळालेल्या माहितीवरुन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी नाशिक ग्रामीण आणि  इतर काही पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. दुकानातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या गुन्ह्यात मालेगाव येथील अकबर खान हबीब खान आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ पथक मालेगाव येथे रवाना होऊन आरोपींना सोमवारी मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. यात उमाईस अहमद शाहेद अख्तर, साकेब अंजुम निहाल अहमद, मुदसिर अहेमद मुदीर अहेमद, अकबर खान हबीब खान, खेसर खान हबीब खान पठाण (सर्व आरोपी रा.मालेगाव, जि.नाशिक) यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाईपोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजू मुत्येपोड, अंमलदार मधूकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, शेख रफियोद्दीन, दिपक मुदीराज, रणजित आगळे, गणेश कौटकर यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी