शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाचे वाढीव मूल्यांकन भोवले; उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सात जण निलंबित

By मारोती जुंबडे | Updated: February 25, 2025 11:10 IST

जालना- परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे केले जात आहे.

परभणी: जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी द्रुतगती महामार्ग अंतर्गत येणाऱ्या वृक्ष, विहीर व घरांचे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याप्रकरणी राज्य शासनाने उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र हरणे यांच्यासह ७ जणांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

जालना- परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे केले जात आहे. परभणी जिल्ह्यातील ४७ गावातून ९३.५२ किलोमीटर हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील ९३३ हेक्टर क्षेत्र जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गामुळे मुंबई आणि नांदेड दरम्यानचा १२ तासाचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे. सध्या या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. परंतु दुसरीकडे या महामार्गावर येणाऱ्या वृक्ष, विहीर, शेततळे, घर व पाईपलाईन यासह आदींचे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकनाचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सेलू तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. या अहवालावर तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने काम करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांनी कार्यवाहीसाठी हा अहवाल  राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी नितीन शेळके यांच्या स्वाक्षरीने उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र हरणे यांच्यासह सात जणांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. 

या अधिकाऱ्यांचा समावेश समृद्धी महामार्गात येणाऱ्या वृक्षांचे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याप्रकरणी उपविभागी कृषी अधिकारी रवींद्र हरणे, सेलू तालुका कृषी अधिकारी शेरन ताजमोहम्मद पठाण, मंडळ कृषी अधिकारी रामप्रसाद जोगदंड, कृषी अधिकारी अशोक कदम, मंडळ कृषी अधिकारी राजहंस खरात, कृषी पर्यवेक्षक प्रकाश लोहार, कृषी पर्यवेक्षक दिगंबर फुलारी या सात जणांना निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रsuspensionनिलंबन