शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पावसात बाभळीचा आडोसा ठरला जीवघेणा; वीज कोसळून शेतमालक, सालगड्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 18:35 IST

शेतात काम सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला अन सर्वांनी बाभळीचा आडोसा घेतला

गंगाखेड - तालुक्यातील उखळी खुर्द शेत शिवारात वीज कोसळून शेत मालक व सालगडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाल्याची घटना आज ( दि.१७ ) सायंकाळी ४ वाजता घडली. शेत मालक बालासाहेब बाबुराव फड ( ५०), सालगडी परसराम उर्फ जयवंत गंगाराम नागरगोजे ( ४०) अशी मृतांची नावे आहेत. 

उखळी खुर्द शेत शिवारात बालासाहेब फड यांचे शेत आहे. आज दुपारी फड, सालगडी जयवंत नागरगोजे आणि तीन मजूर शेतात काम करत होते. असताना पाऊस आल्याने मालकासह सालगडी, शेत मजुर बाभळीच्या झाडाखाली थांबले.  दरम्यान, जोराच्या पावसाबरोबर कडकाडासह वीज बाभळीवर कोसळली. यात शेतकरी बालासाहेब फड आणि सालगडी जयवंत नागरगोजे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर राईबाई बाबुराव फड ( ७०), सतीश सखाराम नरवाडे ( ३५), राजेभाऊ किशन नरवाडे ( ४०) हे तीन मजूर जखमी झाले. माहिती मिळताच गंगाखेड पोलिस ठाण्याच्या निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, बिट जमादार रंगनाथ देवकर आदी कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी