शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

'फर्जी' शाहीदचे अनुकरण; घरीच दोनशेच्या नोटा छापल्या, टपरी चालकास पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 20:02 IST

या प्रकरणात एकास अटक करण्यात आली असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता  

मानवत (परभणी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मानवत शहरातील खंडोबा रोड परिसरात धाड टाकून भारतीय बनावटीच्या चलनातील 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला अटक केली होती. विशाल संतोष खरात असे आरोपीचे नाव असून आज न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, विशाल खरातने ' फर्जी' वेबसिरीज पाहून बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस आले आहे.

शहरातील खंडोबा रोड परिसरातील विशाल संतोष खरात हा तरुण आपल्या घरात कलर प्रिंटरवरून 200 रुपयांच्या बनावट नोटा छापत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी दुपारी 4:30 वाजता खंडोबा रोड परिसरात विशाल संतोष खरातच्या घरी छापा टाकला. यावेळी 200 रुपयांच्या 27 बनावट नोटा, 82 नोटांची प्रिंट, 11 अर्धवट प्रिंट, कलर प्रिंटर, रंगीत कागद, वाटर मार्क असे साहित्य आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी विशालला ताब्यात घेऊन सर्व साहित्य जप्त केले. आज न्यायालयाने आरोपीस 20 मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

वेबसिरीजपासून प्रेरणा, यु ट्यूबवरून धडेविशाल संतोष खरात हा मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या गाजत असलेली बनावट नोटावर आधारित वेबसिरीज 'फर्जी' पाहून प्रेरणा घेत विशालने युट्युबवरील व्हिडिओ पाहत प्रिंटींग तंत्र शिकले. त्यानंतर तो नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्न करीत  होता. मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडला. केवळ शौक पूर्ण करण्यासाठी त्याने हा प्रताप केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी