शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 16:53 IST

सात महिन्यांची गर्भवती असताना ५ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरी जळून मरण पावली.

ठळक मुद्दे घर बांधण्यासाठी ५० हजार रुपयांची

परभणी :  विवाहितेचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूला न्यायालयाने एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

परभणीच्या न्यायालयाने १ डिसेंबर रोजी हा निकाल दिला. मानवत तालुक्यातील रसिकाबाई सटवाजी ढवळे यांची मुलगी पूजा हिचा विवाह सावरगाव (ता.मानवत) येथील अमोल भागोजी एडके याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी अमोल आणि पूजाची सासू कांताबाई भागोजी एडके यांनी घर बांधण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी पूजा हिच्याकडे केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. या छळाला कंटाळून पूजा ही सात महिन्यांची गर्भवती असताना ५ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरी जळून मरण पावली. या प्रकरणी रसिकाबाई ढवळे यांच्या फिर्यादीवरुन छळ करणे आणि मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन पती अमोल व सासू कांताबाई यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. मनाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले.या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्या.एस.एम. पाटील यांनी छळ केल्याच्या प्रकरणात आरोपी पती अमोल व सासू कांताबाई यांना दोषी सिद्ध करीत प्रत्येकी एक वर्षाची सक्तमजुरी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन  तीन वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीSuicideआत्महत्या