तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी सिद्धेश्वर जाधव (वय ३२) हे पत्नी अनिता जाधव यांच्यासोबत (एमएच.२२ ए.के. ८५५९) दुचाकीवरून सासुरवाडी असलेल्या तालुक्यातील केकरजवळा येथे गेले होते. शुक्रवारी सायंकाळी आपल्या लोहारा या गावी परत जात असताना रात्री साडेआठच्या सुमारास रामटाकळी शिवारात पोखर्णी रस्त्यावर (एमएच.४४ यु.३१०) या क्रमांकाच्या टिप्पर चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून जोराची धडक दिली. या अपघातात सिद्धेश्वर जाधव यांचा मृत्यू झाला तर अनिता जाधव या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सपोनि. भरत जाधव, जमादार उद्धव माने यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, धडक दिलेला टिप्पर आणि अन्य एक टिप्पर मंगरूळ बुद्रुक येथून पाथरीकडे जात होता. या दोन टिप्परमध्ये पुढे जाण्याच्या स्पर्धेतून या दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
टिप्परच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST