परभणी शहरासह जिल्ह्याला मनमाड येथील डेपोतून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो. या इंधनाचा वाहतूक खर्च अधिक असल्याने इतर शहरांच्या तुलनेत परभणीचे पेट्रोल व डिझेलचे दर अधिक आहेत. शनिवारी परभणीत पेट्रोलचा दर तब्बल ९२ रुपये १८ पैसे लिटर होता. हाच दर बीड शहरात ९० रुपये ८१ पैसे, लातूरमध्ये ९० रुपये ८३ पैसे, जालना येथे ९१ रुपये ३२ पैसे प्रतिलिटर होता. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच शहरात ९० रुपये प्रतिलिटर पेट्रोलचा दर होता. याशिवाय शहरात शनिवारी डिझेलचा दर ८० रुपये ९९ पैसे प्रतिलिटर होता. बीडमध्ये हा दर ७९.७३ पैसे, पुणे येथे ७८ रुपये ४१ पैसे, लातूर येथे ७९ रुपये ७६ पैसे, तर जालना येथे ८० रुपये २१ पैसे होता. त्यामुळे परभणीकर सर्वाधिक रक्कम देऊन पेट्रोल व डिझेल या इंधनांची खरेदी करीत आहेत. परिणामी परभणीकरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत (दिल्लीसाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST