शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

परभणी: वाळूघाट लिलावाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून, साधारणत: दोन महिन्यांमध्ये वाळू घाट खुले होतील, अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे़तब्बल दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू चोरी वाढली आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे लिलावाअभावी जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, वाळू घाटांच्या लिलावाची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे़दरम्यान, सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसानंतर सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने वाळू उपसा करणेही शक्य नव्हते़ मात्र आता काही वाळू घाटांमधून वाळू उपसा करणे शक्य झाल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या वतीने ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार केला असून, हा आराखडा मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ खनिकर्म संचालनालयाची मंजुरी मिळाल्यानंतर वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी जनसुनावणी घेणे त्यानंतर राज्य समितीच्या बैठकीत या प्रक्रियेला मंजुरी घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे़ या सर्व प्रक्रियेला साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांना वाळू घाट खुले होण्यासाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात झाल्यामुळे जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़गोदावरी नदीवरील सर्वाधिक घाट४जिल्हा प्रशासनाने खाणकाम आराखडा तयार केलेल्या ३० घाटांमध्ये गोदावरी नदीवरील सर्वाधिक वाळू घाट आहेत़ या नदीवर १८, पूर्णा नदीवरील ७ आणि दूधना नदीवरील ५ वाळू घाटांचा समावेश आहे़४त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील सर्वाधिक ९ वाळू घाटांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्याखालोखाल परभणी तालुक्यातील ५, गंगाखेड तालुक्यातील ४, सेलू, पालम तालुक्यातील प्रत्येकी ३, सोनपेठ, मानवत आणि जिंतूर तालुक्यातील प्रत्येकी २ वाळू घाटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत़जनसुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी४वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे़ शासनाच्या नियमानुसार भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाने मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांची जन सुनावणी घेणे आवश्यक आहे़४या सुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित करून दिला आहे़ त्यामुळे जनसुनावणी वाळू घाटांच्या मंजुरीसाठीच तब्बल एक महिन्याचा कालावधी लागणार आहे़ त्यानंतर जनसुनावणीत मंजूर झालेल्या वाळू घाटांना स्टेट इन्व्हार्नमेंट असेसमेंट कमिटी (एसईएसी) आणि स्टेट इन्व्हार्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अ‍ॅथॉरिटी (एसईआयएए) या दोन समित्यांच्या मंजुरी घेणे आवश्यक आहे़४ही मंजुरी मिळाल्यानंतर ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, या प्रक्रियेनंतर मंजूर झालेल्या वाळू घाटांची रक्कम जमा करून घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे़ त्यामुळे किमान दोन महिने येथील नागरिकांना खुल्या वाळूसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे़या वाळू घाटांचे प्रस्ताव सादरजिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचे खाणकाम आराखडे तयार केले आहेत़ त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, धनगर टाकळी, पेनूर, कळगाव, धानोरा मोत्या, मुंबर, कानडखेड, पिंपळगाव सारंगी, पिपंळगाव बाळापूर, गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, आनंदवाडी, सोनपेठ तालुक्यातील लोहीग्राम, पोहंडूळ, परभणी तालुक्यातील काष्टगाव, जोड परळी, सावंगी खुर्द, नांदगाव खुर्द, पिंपळगाव टोंग, मानवत तालुक्यातील शेवडी जहांगीर, वांगी, सेलू तालुक्यातील खादगाव, मोरेगाव, काजळी रोहिणा, जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके, वझूर-२ आणि पालम तालुक्यातील राहटी, दुटका, धनेवाडी या वाळू घाटांचे खाणकाम आराखडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग