शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका; ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 18:56 IST

Rain in parabhani : ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, जागोजागीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ७० मि.मी. पाऊस झाला आहे.सिंगणापूर मंडळात सर्वाधिक ९५.३ मि.मी. पाऊस झाला

परभणी : जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांपैकी ३१ मंडळांमध्ये बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात दाणादाण उडाली असून, जिल्हा आणि तालुक्याचे मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाले आहे. ओढ्याचे पाणी गावात शिरल्याने काही गावांत ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. मात्र रात्री पावसाने जोर पकडला. हळूहळू सर्वच भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, जागोजागीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी ७० मि.मी. पाऊस झाला आहे. ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यताच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करताना परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात सर्वाधिक ९५.३ मि.मी. पाऊस झाला असून, सर्वात कमी पाऊस याच तालुक्यातील पिंगळी मंडळात ३५ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे परभणी शहराला जोडणारे पालम- परभणी, पाथरी-परभणी, गंगाखेड- परभणी, ताडकळस- परभणी या प्रमुख मार्गावर पाणी असल्याने परभणीशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्याला जोडणाऱ्या बहुतांश मार्गावर पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.

धरणांचे उघडले दरवाजेया पावसामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ३, मुदगल बंधाऱ्याचे २ आणि तारुगव्हाण बंधाऱ्याचे २ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पूर्णा, गोदावरी या दोन्ही नद्या दुथडी भरुन वहात असून, येलदरी धरणाच्या वरच्या भागात अतिवृष्टी झाल्याने या प्रकल्पातही पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

या मंडळात झाली अतिवृष्टीपरभणी ९३.५ मि.मी., पेडगाव ८२, जांब ८०, झरी ७७.३, सिंगणापूर ९५.३, परभणी ग्रामीण ८०.८, टाकळी कुंभकर्ण ८५, राणीसावरगाव ६५.३, पाथरी ९५.८, बाभळगाव ७५.३, कासापुरी ७१.३, जिंतूर ८१, बामणी ९७, बोरी ७८.५, चारठाणा ८०.५, वाघी धानोरा ७७, ताडकळस ८१.३, लिमला ७४.८, चुडावा ६६.३, पालम ६७, बनवस ६८, देऊळगाव ८५.३, सेलू ९०.५, वालूर ७८.३, कुपटा ८०.५, चिकलठाणा ७५.३, मोरेगाव ८९.५, मानवत ९५.३, केकरजवळा ८७.५, कोल्हा ८४.५, ताडबोरगाव ६७.३ मि.मी. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती