शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

परभणी जिल्ह्यात दोन मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:33 PM

आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस

ठळक मुद्देधुंवाधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला होता़

परभणी- जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस होत असून, मंगळवारी रात्री पालम आणि पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे़ या दोन्ही मंडळात झालेल्या धुंवाधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला होता़

यावर्षीच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात जोरदार पाऊस होत आहे़ आठवडाभरापासून जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी लागत आहे़ मंगळवारी परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ त्यात पालम तालुक्यातील पालम मंडळात ६६ मिमी तर पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ विशेष म्हणजे रविवारी देखील हादगाव मंडळात जोरदार पाऊस झाल्याने हादगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि काही घरे पाण्याखाली आली होती़ या मंडळात सलग दुसऱ्यांदा मोठा पाऊस झाला आहे़

जिल्हाभरात दमदार पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत परभणी तालुक्यात १५ मिमी, पालम ५०़६७ मिमी, पूर्णा १२़२०, गंगाखेड ९, सोनपेठ २, सेलू ११़४०, पथरी ३०, मानवत तालुक्यात ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सरासरी १५़२५ मिमी पाऊस झाला असून, जिल्हाभरात आतापर्यंत ५६२़२८ टक्के पाऊस झाला़ सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के म्हणजे ६६१ मिमी पाऊस झाला आहे़ त्याखालोखाल पालम तालुक्यामध्ये ८४ टक्के म्हणजेच ५९२ मिमी पाऊस झाला तर परभणी ताुलक्यात ४५७ मिमी (५६़९ टक्के), पूर्णा तालुक्यात ६९१ मिमी (८१ टक्के), गंगाखेड ५८२ मिमी (८३ टक्के), सोनपेठ ५१६ मिमी (७४ टक्के), सेलू ५०३ मिमी (६१ टक्के), जिंतूर ४८८ मिमी (६० टक्के) आणि मानवत तालुक्यात ६०८ मिमी (७४़५ टक्के) पाऊस झाला आहे़

आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊसअरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणा  भागात सध्या पाऊस होत आहे़ हा पाऊस मान्सूनचा पाऊस असून, अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही, अशी माहिती कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी दिली़ मान्सूनचा कालावधी हा सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर असा  चार महिन्यांचा असतो़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात  होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन महिने मान्सून उशिराने दाखल झाला़ त्यामुळे परतीचा पाऊसही आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे़

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र