शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस; नदी-ओढ्यांना पाणी, तीन मार्गावरील वाहतूक ठप्प

By राजन मगरुळकर | Updated: September 26, 2023 14:40 IST

परभणी शहरात सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरु झाला.

परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून सर्वच तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यात सेलू आणि पाथरी तालुक्यात तीन मार्गावरील नदी-नाले-ओढ्याला पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प पडली होती. यात चारठाणा-वालूर, मोरेगाव-वालूर आणि पाथरी-आष्टी रस्त्यावरील किन्होळा गावाला जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने हे मार्ग दोन ते तीन तास बंद होते. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

परभणी शहरात सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरु झाला. दूपारपर्यंत हा पाऊस जिल्ह्यात कायम होता. यात चारठाणा परिसरात मुसळधार तर झरी परिसरात रिमझिम पाऊस झाला. याशिवाय पूर्णा तालुक्यातील ताडकळस शिवारात चांगला पाऊस झाला. सेलू तालुक्यातील गोंडगे पिंपरी गावालगत असलेल्या नदीला पुर आल्याने मंगळवारी दूपारी दोन तास चारठाणा - वालूर रस्त्यावरील वाहतुक ठप्प होती. सेलू तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. मोरेगाव- वालूर रस्त्यावरील हातनुर गावाजवळील ओढयाला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच पाथरी-आष्टी रस्त्यावर किन्होळाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने सकाळी काही तास वाहतूक बंद होती.

निम्न दुधना प्रकल्पात दोन दलघमी पाण्याची आवकजालना जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात एकूण दोन दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जूनपासून आजपर्यंत १७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत २६.६० टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षी याच वेळी प्रकल्पात ७४.८६ टक्के पाणी होते. यंदा आतापर्यंत ४६१ पर्जन्यमान झाले आहे. चार महिन्यात प्रकल्पात १७.३५४ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीFarmerशेतकरी