शहरात शुक्रवारी सकाळपासून कडक उन्हाचे चटके बसत असताना दुपारी चारनंतर काळेकुट्ट ढग दाटून आले. यानंतर सुरु झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला. परभणी शहरासह परिसरात सुमारे एक तास हा पाऊस झाला. विजेच्या कडकडाटात काही वेळ जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमान ४० अंश एवढे राहत आहे. यामुळे उष्णता वाढण्यास सुरवात झाली आहे. दुपारच्या तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके बसत आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने परभणी शहरासह परिसरात गुरुवारी, शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता मागील तीन दिवसांपूर्वी वर्तविली होती. त्या अंदाजाप्रमाणे शुक्रवारी दुपारी ४:३० वाजल्यापासून पाऊस झाला. एक तास जोरदार पाऊस झाल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्ह्यातील गंगाखेड, पोखर्णी येथे सायंकाळी पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. अन्यत्र कुठेही सायंकाळपर्यंत पाऊस झाला नव्हता.
परभणीत एक तास जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST