शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:24 IST

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़पालम तालुक्यात सहा ३३ केव्ही उपकेंद्रातून गावठाण व शेतातील कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो़ सहा उपकेंद्रांना गंगाखेड येथून केवळ एका वीज वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात असल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी होत असल्याने तसेच गंगाखेड येथून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने महावितरणच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे़ आठ दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध असूनही विजेच्या कमी दाबामुळे कृषीपंप चालत नाहीत़केरवाडी फिडरला : सर्वाधिक फटकाकेरवाडी फिडरमधून १८ गावांना वीज पुरवठा केला जातो़ दोन विभागात गावे विभागूनही पुरवठा सुरळीत होत नाही़ जुनाट यंत्रणा असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होतात़ गोदाकाठची गावे व कृषीपंपांचा मोठा भार असल्याने या फिडरवरील गावांना नेहमीच वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होत असलयाने फटका सहन करावा लागत आहे़पालम तालुक्यात ग्रामीण भागात विविध फीडरचे लाईनमनच्या मदतीने दोन भाग करून वीज पुरवठा केला जात आहे. पालमच्या केंद्रात २०० एम्पीयरपर्यंत लोड सहन करणारी यंत्रणा आहे. पण फीडर चालू करताच हा भार २३० ते २४० पर्यत जात आहे. त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.-व्ही. डी. स्वामी, उपकार्यकारी अभियंता, पालम

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन