शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशी द्या, सेलूकर एकवटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:03 IST

शहरात बंदला प्रतिसाद, मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला 

सेलू (परभणी) : अल्पवयीन मुलीसह तिचा मावस भावाला दुचाकीवरून पळून नेऊन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सेलूकरांनी तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन दिले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची वार्ता पसरताच शहरातील नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेअकरा वाजता शहरातील क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आरोपींना फाशी झालीच पाहिजे या प्रमुख मागणी असलेले फलक हातात घेऊन महिला व मुलींनी घोषणाबाजी करत मुख्य रस्त्यावरून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. अशा घटना रोखण्यासाठी त्या नराधमांना फाशीची शिक्षा करा, अशी मागणी तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देऊन करण्यात आली. मोर्चात विविध पक्षाचे संघटनेचे  पदाधिकारी यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवाया घटनेमुळे दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबावर मोठा अघात झाला आहे. समाजातील अशा अपप्रवृत्तीना कायमचा धडा शिकवण्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहीजे. अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.  मुलीवर अत्याचार करणा-या दोन्ही आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी  करत  घोषणांनी मोर्चा-यांनी शहर दणाणून सोडले. 

काय आहे प्रकरणशहरातील १० वर्षीय मुलगी व तिचा मावस भाऊ हे सोमवारी सेलू- देवगाव रस्त्यावर उभे होते. दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून वालूर मार्ग कौसडीकडे नेले. तिच्या मावस भावास कौसडी येथील रस्त्यावर सोडून देऊन मुलीला कोक शिवारात नेऊन अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस यंञणेची झोप उडाली होती. पोलीस अधीक्षक जयंत मीना अप्पर पोलीस अधीक्षक मुक्कमा सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक अविनाश कुमार आदी वरिष्ठ अधिकारी यांनी सेलू पोलीस ठाणे गाठून तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्हीतील फुटेच्या माध्यमातून बुधवारी पोलीसांनी राजेगाव शिवारातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी