शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अनंता टोम्पेंच्या खुन्यांना फाशी द्या; मूकमोर्चातून पाथरीकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:19 IST

अनंता हरिभाऊ टोम्पे यांचा पैशांच्या वादातून अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता.

पाथरी (पाथरी): पैशाच्या देवाणघेवानाच्या व्यवहारातून अमानुष मारहाण करून अनंता टोम्पे यांची हत्या करण्यात आली  त्याना न्याय मिळावा, गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे आणि पुन्हा कुणाचंही घर असं उजाडू नये, अशी मागणी करत सोमवारी (२१ एप्रिल) पाथरी येथे मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला-पुरुष, विद्यार्थी सहभागी झाले होते. 

अनंता हरिभाऊ टोम्पे यांचा पैशांच्या वादातून अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह नगरपरिषदेच्या बाबा टॉवरजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात आढळून आला. ही घटना संपूर्ण पाथरी शहराला हादरवून गेली आहे. चालक असलेले टोम्पे अत्यंत साधारण घरातील होते. त्यांच्या हत्येने टोम्पे यांची पत्नी आणि पाच मुली रस्त्यावर आल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी पाथरीकरांनी आर्थिक मदत दिली होती. त्यानंतर न्यायाची मागणी करत पाथरीकर सरसावले आहेत.

आज मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता राम मंदिर परिसरातून झाली.“आरोपीस कठोर शिक्षा द्या”, “अनंता टोम्पेंना न्याय मिळावा”, “आमचं घर असं उजाडू नये” असे फलक घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालत चालत मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला, जिथे प्रशासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली. “गुन्हेगारास फक्त शिक्षा नाही, तर कठोरात कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून समाजात भय निर्माण होईल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच टोम्पे कुटुंबाचे पुनर्वसन करावे,” अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी