गर्भ संस्कार केंद्रातर्फे मार्गदर्शन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:21 AM2021-09-12T04:21:59+5:302021-09-12T04:21:59+5:30

विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांनी शास्त्रोक्त पालकत्व या विषयी माहिती दिली. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुवातीची आठ ...

Guidance program by Garbha Sanskar Kendra | गर्भ संस्कार केंद्रातर्फे मार्गदर्शन कार्यक्रम

गर्भ संस्कार केंद्रातर्फे मार्गदर्शन कार्यक्रम

Next

विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांनी शास्त्रोक्त पालकत्व या विषयी माहिती दिली. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुवातीची आठ वर्षे अतिशय महत्त्वाची असल्याने, पालकांनी त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुदृढ आणि बुद्धिमान अपत्यप्राप्तीसाठी संवाद गर्भसंस्कार केंद्रामध्ये योग, आसने, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेदिय औषधी, मनोरंजन अशा कार्यांवर भर देण्यात येत असून, आत्तापर्यंत अनेक कुटुंबीयांनी या केंद्राचा लाभ घेतल्याचे या केंद्राच्या संचालिका डॉ.सुरेखा भंडारी यांनी सांगितली, तसेच या ठिकाणी संवाद द स्टुडिओ ऑफ योगा अंतर्गत लहान मुले, महिला व पुरुषांसाठी नियमित योगवर्ग, योगिक शुद्धिक्रिया, पंचकर्म, बंगळूर येथील योगक्षेत्रातील जगप्रसिद्ध आंतराष्ट्रीय संस्थेअंतर्गत मान्यता प्राप्त योगशिक्षक अभ्यासक्रम विविध आजारांसाठी योगोपचार अशा राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाविषयी डॉ.रवि भंडारी यांनी माहिती दिली. तारा लाखरा व स्वाती देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुरेखा भंडारी यांनी आभार मानले. या कार्यशाळेला पालकांतर्फे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

Web Title: Guidance program by Garbha Sanskar Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.