शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदवार्ता; पूर्णा-जालना, जालना-नांदेड विशेष रेल्वे सुरू

By राजन मगरुळकर | Updated: June 10, 2023 16:22 IST

याशिवाय मेडचल-नांदेड डेमू रेल्वेचा विस्तार काचीगुडा ते पूर्णा स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रवाशांची मागणी लक्षात घेता दोन विशेष रेल्वे मराठवाडा विभागातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या रेल्वे शनिवारपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पूर्णा ते जालना आणि जालना ते नांदेड या विशेष रेल्वेचा समावेश आहे. याशिवाय मेडचल-नांदेड डेमू रेल्वेचा विस्तार काचीगुडा ते पूर्णा स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.

रेल्वे क्रमांक (०७९७०) मेडचल-नांदेड डेमू रेल्वे ही काचीगुडा ते पूर्णा दरम्यान विस्तारीकरणात धावणार आहे. ही रेल्वे काचीगुडा येथून दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे. ही रेल्वे सिताफलमंडी, मलकजगिरी, बोलाराम, कोचमपल्ली, मेडचल, नांदेड, पूर्णा अशी धावणार आहे. रात्री ९.३५ मिनिटांनी ही रेल्वे पूर्णा येथे पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक (०७१८१) पूर्णा ते जालना ही रेल्वे दररोज रात्री नऊ वाजता पूर्णा येथून सुटणार आहे. ही रेल्वे परभणी, पेडगाव, मानवत रोड, सेलू, परतुर मार्गे जालना येथे रात्री १.५० वाजता पोहोचणार आहे. तर रेल्वे क्रमांक (०७१८२) ही परतीच्या प्रवासात जालना ते नांदेड अशी धावणार आहे. ही रेल्वे दररोज रात्री ९.२५ मिनिटांनी जालना येथून सुटणार आहे. परतुर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा मार्गे नांदेड येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचणार आहे.

सिकंदराबाद-नगरसोल विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्यादक्षिण मध्य रेल्वे विभागाने सिकंदराबाद ते नगरसोल या दोन स्थानकाच्या दरम्यान जून महिन्यात सहा विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेल्वे क्रमांक (०७५१७) सिकंदराबाद- नगरसोल ही रेल्वे १४, २१, २८ जूनला बुधवारी सायंकाळी ५ वाजता सिकंदराबाद येथून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी आठ वाजता सदरील रेल्वे नगरसोल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक (०७५१८) नगरसोल-सिकंदराबाद ही रेल्वे १५, २२, आणि २९ जून रोजी गुरुवारी रात्री दहा वाजता नगरसोल येथून सुटणार आहे. ही रेल्वे शुक्रवारी सकाळी १०.५० वा. सिकंदराबाद पोहोचणार आहे. ही रेल्वे लिंगमपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, सेलू, जालना, रोटेगाव मार्गे नगरसोल जाणार आहे. या रेल्वेला वातानूकूलित, शयनयान, सर्वसाधारण डब्बे जोडलेले असतील.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनparabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासी