शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतीत उपयुक्त सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी विद्यापीठाने घेतला महत्वाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:25 IST

High production of useful solar equipment in agriculture on track येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत विकसित केलेले विविध सौर उपकरणे शेतकऱ्यांच्या पसंतीला पडले आहेत.

ठळक मुद्दे आता शेतीसाठी उपयुक्त सौर उपकरणे सहज मिळणार; निर्मितीसाठी कृषी विद्यापीठाचा नाशिकच्या कंपनीशी करार

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प योजनेअंतर्गत विकसित शेती अवजारे व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी विद्यापीठाने १५ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील मे. इन्व्हेटिव्ह सोल्युशन्स या कंपनीशी व्यावसायिक सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे कमी श्रमामध्ये अधिक शेतीकाम करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या शेती अवजारांची मागणी पूर्ण होणार आहे. 

येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत विकसित केलेले विविध सौर उपकरणे शेतकऱ्यांच्या पसंतीला पडले आहेत. राज्यातील विविध भागांतून या उपकरणांना मागणी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन उपकरणे बनविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मे. इन्व्हेटिव्ह सोल्युशन्स या कंपनीशी विद्यापीठाने व्यावसायिक करार केला आहे. कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, यंत्र विकसित करणाऱ्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागप्रमुख डॉ. राहुल रामटेके, कंपनीचे संचालक व अभियंते प्रशांत पवार, सौरभ जाधव, शास्त्रज्ञ डी.डी. टेकाळे, ए. ए. वाघमारे, डॉ. मदन पेंडके आदींची उपस्थिती होती. या करारावर विद्यापीठाच्या बाजूने संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. स्मिता सोलंकी तर कंपनीच्या वतीने प्रशांत पवार यांनी स्वाक्षरी केली.

कमी श्रमामध्ये अधिक शेतीकाम करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले शेती अवजारे शेतकऱ्यांना उपयुक्त असून, त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. या सामंजस्य करारामुळे शेतकऱ्यांची यंत्राची मागणी पूर्ण होणार असल्याचे डॉ. अशोक ढवण यांनी यावेळी सांगितले.

कोणती यंत्रे बनविली जाणारया सामंजस्य करारामुळे विद्यापीठाने विकसित केलेली सौरऊर्जा आधारित जनावरे/पक्षी घाबरवणारे यंत्र, सौर ड्रायर, बैलचलित फवारणी यंत्र, काडी कचरा गोळा करणारे यंत्र, गादी वाफा करून प्लास्टिक अंथरवणारे यंत्र, तीन पासेचे फनासहित कोळपे, ट्रॅक्टर चलित बूम फवारणी संरचना, ऊस व हळद पिकात भर लावणारे यंत्र, बहुउद्देशीय पेरणीसह फवारणी यंत्र आदी यंत्रांची निर्मिती कंपनीला करता येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ