शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत कपड्याच्या गोडाऊनला आग, लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक

By राजन मगरुळकर | Updated: January 9, 2024 14:20 IST

परभणी शहरातील वैभव नगर भागातील घटना : बघ्यांची गर्दी

परभणी : जिंतूर रोड भागातील वैभव नगरमध्ये असलेल्या एका गोडाऊनसह कपड्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अवघ्या काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. यात गोडाऊन आणि पत्राच्या शेडमध्ये ठेवलेल्या कपडे, विविध प्रकारच्या साहित्याला आगीने वेढले. यात लाखोंचा माल जळून खाक झाला. घटनेनंतर अग्निशमन विभागाने घटनेनंतर काही वेळातच दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरात वैभव नगर आहे. या नागरी वस्तीमध्ये प्रशांत प्रमोदराव जाधव यांचे गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या घराच्या भागात पत्राचे शेड आणि कपडे तयार करण्याचा कारखाना सोबतच गोडाऊन आहे. मंगळवारी सकाळी जाधव यांचे कुटुंबीय घरामध्ये असताना अचानक आग लागल्याचे समोर आले. घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता आग लागल्याचे समजले. यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी तेथे आले. ही माहिती परभणी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविली असता काही वेळातच अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी एक तास प्रयत्न केले. अखेर आग पूर्णपणे शमविण्यात यंत्रणेला यश आले. घटनास्थळी महावितरण आणि पोलिस यंत्रणेचे अधिकार, कर्मचारी दाखल झाले होते. दुपारपर्यंत पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजले नसले तरी मात्र शाँर्टसर्किंटचा अंदाज व्यक्त होत आहे.

सुमारे ५० लाखांचे नुकसानहा कारखाना येथे गेल्या ५ वर्षापासून आहे. येथे विविध प्रकारचे कपडे तयार केले जातात. ज्यात टी शर्ट आणि नाईट पँट तयार केली जाते. येथे ठेवण्यात आलेल्या साहित्यामध्ये ५० ते ५५ लाख रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाल्याची माहिती मालक प्रशांत प्रमोदराव जाधव यांनी दिली. साधारणपणे दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये येथून कपडे विक्रीसाठी ते पाठवत. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग