जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्वच प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बाजारपेठेतील दुकाने बंद असताना सुद्धा मोकाटपणे रस्त्यावर बिनधास्त फिरणाऱ्या तरुण युवकांबरोबर नागरिकांची गर्दी मात्र काही कमी झाली नाही. काही काम नसताना ग्रामीण भागातील तरुण व अन्य ग्रामस्थ गावातील पारावर, झाडाखाली घोळका करून गप्पा मारीत बसत असल्याचे दिसून आले. शहरातील नागरिक नियमांना बगल देत गल्लीबोळासह व्यापारपेठेतील दुकानांच्या बाहेर असलेल्या ओट्यावर तसेच चौकाचौकात घोळक्याने थांबून व गावभर फिरून संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.
थेट कोरोना तपासणी करा
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये काही काम नसताना घराबाहेर पडून रस्त्याने बिनधास्त व मोकाट फिरणाऱ्या बेजबाबदार तरुण व नागरिकांना मिळेल तिथे थांबवून त्यांची कोरोना तपासणी करणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांतून बोलल्या जात आहे.