शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड- परभणी रोडवर तरुण शेतकऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 18:40 IST

गंगाखेड-परभणी रस्त्यावर महातपुरी फाट्यावर अपघात

ठळक मुद्दे ट्रकने दुचाकी चालकास जवळपास पन्नास फूट अंतरापर्यंत फरफटत नेले.

गंगाखेड: भरधाव वेगात परभणीकडे जाणाऱ्या दहा चाकी ट्रकने दुचाकीवरील तरुण शेतकऱ्यास चिरडल्याची घटना शनिवारी (दि. ७ ) दुपारी २:२० वाजेच्या सुमारास गंगाखेड-परभणी रस्त्यावर महातपुरी फाट्यावर घडली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल सोपानराव बडे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो गंगाखेड येथील रहिवासी होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल बडे हा तरुण शेतकरी दुपारच्या जेवणासाठी महातपुरी शिवारातील शेतातून दुचाकीवर घराकडे येत होता. याचवेळी गंगाखेड येथून परभणीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दहा चाकी ट्रकने (क्रमांक एमपी १३ डीए ०४५७)  अनिलच्या दुचाकीला (क्रमांक एमएच २२ एसी ६८९०) जोरदार धडक दिली. भरधाव वेग असल्याने ट्रकने अनिलला दुचाकीसह जवळपास पन्नास फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यामुळे अनिलचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा होऊन समोरील चाक तुटून एका बाजूला पडले होते. 

अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलराव घोगरे, जमादार सुनील लोखंडे, अ. मुजीब, दत्तराव पडोळे, श्रीकृष्ण तंबूड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रावण भालेराव यांच्या खाजगी रुग्ण वाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांचा लहान मुलगा, वृद्ध आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. महातपुरी फाट्याची हद्द सोनपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यूAccidentअपघात