लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : शहरातील भगवतीनगरामध्ये ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरात घुसून किंमती मोबाईल, अंगठी व रोख रक्कमेसह ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.शहरातील भगवतीनगरातील रहिवासी रामेश्वर मुंजाजी गायकवाड हे ३१ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराबाहेर दुकानासमोर थांबले होते. यावेळी अविनाश पाळोदे (रा.बनपिंपळा) याने घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये चार्जिंगला लावलेला १७ हजार ९९९ रुपयांचा मोबाईल, पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेले रोख १३ हजार रुपये व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी रामेश्वर गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अविनाश पाळोदे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जमादार रंगनाथ देवकर, माणिक जाधव तपास करीत आहेत.
गंगाखेड (परभणी) येथे ४५ हजारांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:41 IST