शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड नगराध्यक्षांना बांधकाम परवान्याच्या वादातून माजी नगराध्यक्षाच्या मुलाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:40 IST

अभियंत्याला मोजणी करण्यासाठी का पाठविले? याच वादातून ही मारहाण झाली. 

ठळक मुद्देगंगाखेड शहरात चौधरी यांच्या दुकानांचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम अभियंत्याने बांधकामस्थळी जाऊन मोजणी केली.

गंगाखेड (जि. परभणी ) : येथील  काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांना काँग्रेसच्याच माजी नगराध्यक्षा अलका चौधरी यांच्या मुलाने मारहाण केल्याची घटना ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गंगाखेड शहरात चौधरी यांच्या दुकानांचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बांधकाम परवान्याचा आॅनलाईन अर्ज त्यांनी केला होता. त्यावर बांधकाम अभियंत्याने बांधकामस्थळी जाऊन मोजणी केली. अभियंत्याला मोजणी करण्यासाठी का पाठविले? याच वादातून ही मारहाण झाली. 

माजी नगराध्यक्ष अलका चौधरी यांचे चिरंजीव सुशांत रविकांत चौधरी, बाळासाहेब रविकांत चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनूस यांच्यासह पाच ते सहा जण ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्या कार्यालयात आले. बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी अभियंत्याला का पाठविले? या कारणावरुन तापडिया यांना थापड-बुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली, असल्याची माहिती मिळाली.

घटनेनंतर विजयकुमार तापडिया हे तक्रार देण्यासाठी रात्री पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी तक्रार अर्जही दिला. मात्र उपचार घेऊन येतो, त्यानंतर सकाळी तक्रार देतो, असे सांगून त्यांनी तक्रार अर्ज वापस घेतला. तशी नोंद ठाण्याच्या स्टेशन डायरीत झाली आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या प्रकरणी तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस