शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

गंगाखेड बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी १० वाहने फोडून एक बस जाळली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:12 IST

मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले.

गंगाखेड (परभणी ) : मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले. बंद दरम्यान आंदोलकांनी १० वाहने फोडून एक बस जाळली.

सकल मराठा समाजाच्या वतीने सोशल मिडियाद्वारे गंगाखेड बंदचे अवाहन करण्यात आल्याने अत्यावश्यक सुविधा व औषधे दुकाने वगळता सर्वच बाजारपेठ कडकडीत बंद होती. सकाळी नऊ वाजता दिलकश चौक येथे जमलेल्या आंदोलकांनी शहरातील भगवती चौक, नेहरू चौक, डॉ. आंबेडकर नगर, बस स्थानक, नवा मोंढा, डॉ. हेडगेवार चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, पोलीस स्टेशन मार्गे परळी नाक्यापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यानंतर महाराणा प्रताप चौक येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. 

यानंतर आंदोलकांनी परभणी राज्य मार्गावर एका कारवर दगडफेक करत काचे फोडली पुढे जात त्यांनी परळी रोडवर चार खाजगी बस, राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेस, एक जेसीबी मशीन वर दगडफेक केली. यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाली आणि त्यांनी परभणी येथुन लातुरकडे जाणारी बस पेटवली. 

आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर परभणी येथून दंगल नियंत्रण पथक बोलाविण्यात आले.  या पथकाने सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. दरम्यान, आंदोलनातील हिंसाचारात पत्रकार बालासाहेब कदम व अंकुश कांबळे हे दोघे जखमी झाले आहेत.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणagitationआंदोलनparabhaniपरभणी