शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कुलूपबंद घरे हेरून चोरी करणारी टोळी परभणी येथे जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 15:33 IST

आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या तीनही घरफोड्या पोलिसांनी उघड केल्या असून तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ठळक मुद्देदोन लाखांचा मुद्देमाल जप्तनानलपेठ पोलिसांची कामगिरीशहरातील वैभवनगर खाजा कॉलनी, लक्ष्मीनगर आणि सिंचन नगर भागात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात चोरीच्या घटना घडल्या

परभणी- आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या तीनही घरफोड्या पोलिसांनी उघड केल्या असून तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील वैभवनगर खाजा कॉलनी, लक्ष्मीनगर आणि सिंचन नगर भागात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. २४ नोव्हेंबर रोजी वैभवनगर येथील रमेश दत्तराव पामे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी नगदी अडीच लाख रुपये, सोन्या- चांदीचे दागिणे चोरुन नेले. तसेच लक्ष्मीनगर भागातील गणेश तुकाराम जोशी आणि सिंचन नगर भागातील बाबाराव भागुजी सोनवणे यांचेही बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली होती. लागोपाठ चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. 

पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी,  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी पथकांची स्थापना केली. त्यात पोलिसांना यश मिळाले असून या घरफोडी प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी शेख सिद्दीकी शेख नूर (२७ रा. इकबालनगर दादाराव प्लॉट) यास ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. ५ डिसेंबर रोजी सय्यद सोनु सय्यद इमाम  यास जालना येथून तर ६ डिसेंबर रोजी नरेश अशोक कोमटवार यास पूर्णा येथून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील किशोर उत्तम कांबळे (रा.पुणे) हा चौथा आरोपी फरार आहे. आरोपींनी चोरीतील सोन्याचे दागिणे अरुण मारोतराव डहाळे यांना विक्री केले होते. डहाळे यांच्याकडून हे दागिणे हस्तगत केले आहेत. 

बंद घरात चोरी करणारी नवी टोळीअप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या प्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, फक्त बंद घरे हेरुन चोरी करणारी टोळी आहे. विशेष म्हणजे पकडलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल नाहीत. परभणी शहरामध्ये बंद असलेली घरे शोधून शेजारच्या घरांना कडी टाकणे आणि चोरी करणे अशी चोरट्यांची मोडस आॅप्रेंटी होती. या नव्या पद्धतीमुळेच तपासाला नवी दिशा मिळाली आणि पोलीस आरोपींपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले. चोरटे गजाआड झाल्याने चो-यांना आळा बसेल असे पानसरे यांनी सांगितले. घरफोडी प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले, सचिन द्रोणाचार्य, बाबासाहेब लोखंडे, पोकॉ.सय्यद उमर, संजय पुरी, मुजमुले, नासेर अन्सारी, अजय रासकटला, विजय रणखांब, अशोक सोडगीर, लखन सोडगीर, सायबर सेलचे बालाजी रेड्डी आदींनी प्रयत्न केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

अशी उघडकीस आली चोरीशहरातील बंद घरांमध्येच चोरी होत असल्याने नानलपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचा-यांनी सर्व भागातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले. यात ब-याच फुटेजमध्ये एकाच वर्णनाचे व्यक्ती रात्रीच्या वेळी फिरत असल्याचे दिसून आले. मात्र सीसीटीव्हीचे फुटेज अंधुक असल्याने आरोपींना ओळखण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत आरोपींचे मोबाईल क्रमांक प्राप्त करुन मोबाईल लोकेशनद्वारे तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील शेख सिद्दीकी शेख नूर हा आॅटोरिक्षा चालक असून तो आरोपींची ने-आण करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

असा पकडला मुद्देमालपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून सोन्याचे नेकलेस (१५ ग्रॅम), दोन सोन्याच्या अंगठ्या (५.५ ग्रॅम), कानातील तीन झुंबर (१५ ग्रॅम) असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच प्रमाणे आरोपी नरेश याच्याकडून ६० हजार रुपये, आरोपी सिद्दीकी १ हजार रुपये, आरोपी सोनु याच्याकडून १० हजार रुपये, एक आॅटोरिक्षा आणि चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणी