परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध बांधकामांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मंजूर करण्यात आली होती; परंतु कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने ही तरतूद १० कोटींवर आणण्यात आली होती. त्यातील ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने वितरित केला आहे. त्यानुसार राज्याच्या कृषी विभागाने २४ मार्च रोजी यासंदर्भात एक आदेश काढला आहे. विशेष म्हणजे हा सर्व निधी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात आला आहे. गेल्या ४ वर्षांपासून या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम वेगाने केले जात असल्याने बांधकामाच्या अंदाजपत्रकात वाढ होत आहे. परिणामी शासनाचे आर्थिक नुकसान होत असताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी मात्र यासंदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे सदरील कंत्राटदाराचे फावत आहे.
बांधकामासाठी कृषी विद्यापीठास साडेतीन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST