शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांशी दगा! २ किलो कमी वजन दाखवून विमा बुडवण्याचा डाव, कंपनीच्या दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:27 IST

शेतकऱ्यांना विमा नाकारण्यासाठी बेकायदेशीर वजन काट्याचा वापर, विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप

- मारोती जुंबडे

परभणी: शेतकऱ्यांना विमा लाभ नाकारण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा धक्कादायक प्रकार पालम तालूक्यातील खरब धानोरा येथे १४ ऑक्टोंबर रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालम तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी खरब धानोरा येथे खरीप हंगामातील सोयाबीन पिक कापणी व सुकवणी प्रयोग घेण्यात आला. हा प्रयोग ग्रामपंचायत अधिकारी अच्युत भालेराव यांच्या मार्फत पार पडला. प्रयोगावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत शेरे (रा. नालंदा नगर, नांदेड) व रणदीप भालेराव (रा. पंचशील नगर, परभणी) उपस्थित होते. प्रयोगानंतर गट क्रमांक ४४/२ मधील सोयाबीन धान्याचे वजन कंपनी प्रतिनिधींच्या काट्याने घेतले असता ते ५ किलो इतके आले. मात्र ग्रामस्थ सदस्य भास्कर कऱ्हाळे यांनी वजनाबाबत शंका उपस्थित केल्याने ग्रामपंचायतीमार्फत दुसरा काटा आणून पुन्हा वजन करण्यात आले असता ते ३ किलो इतके आढळले.

दोन किलोचा फरकयाबाबत तालुका विमा समिती अध्यक्षा तहसीलदार उषाकिरण श्रिंगारे, गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे व कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या उपस्थितीत काट्यांची तपासणी करण्यात आली. त्यात वजनात मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वजन मापे निरीक्षक संजय धुमाळे यांच्याकडून काट्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली. त्यांच्या अहवालानुसार कंपनीचा काटा सदोष असून वजनात १.९७७ किलोचा फरक आढळला आहे.

विमा नाकारण्यासाठी कटया बेकायदेशीर प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांना विमा मदत मिळू नये यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेवर उघड झाला. या बेकायदेशीर प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांना विमा मदत मिळू नये, यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेवर उघड झाला. या प्रकारामुळे तालुका कृषी विभाग व ग्रामस्तरीय विमा समितीने ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या दोन्ही प्रतिनिधींविरुद्ध मंगळवारी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Insurance Scam: Company Allegedly Cheated Farmers with Faulty Weighing Scale

Web Summary : Insurance company representatives in Parbhani allegedly used a faulty scale, underreporting crop weight to deny farmers insurance benefits. Police filed a case against two individuals after villagers discovered the discrepancy during a crop cutting experiment.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfloodपूरparabhaniपरभणी