शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास सचिवांनी परभणीतील दुकानांचे सील काढण्याचे आदेश दिल्याने व्यापार्‍यांचे आंदोलन मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:53 IST

एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव  यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्‍यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्दे४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव  यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले.त्यानंतर व्यापार्‍यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले.

परभणी : एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव  यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्‍यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले.

एलबीटी थकबाकीच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून व्यापार्‍यांवर कारवाई सुरु केली होती. या अंतर्गत ७ दुकानांना सील ठोकण्यात आले होते. त्यापैकी तीन दुकानदारांनी थकबाकीची काही रक्कम भरल्याने हे सील काढण्यात आले. तर चार दुकान मालकांनी थकबाकीची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने मनपाने या दुकानांचे सील काढले नव्हते. या विरोधात जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने ८ डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या अंतर्गत १५ डिसेंबर रोजी व्यापार्‍यांनी मनपावर मोर्चा काढला होता. याच दिवशी नागपुरात आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानमंडळासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.डॉ.पाटील यांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नगरविकास विभागाने एलबीटी थकबाकी वसुलीस स्थगिती देण्यास आली. परंतु, ज्या चार दुकानांना सील ठोकण्यात आले होते. त्यांचे सील काढण्याबाबतचा निर्णय झाला नसल्याने व्यापार्‍यांनी आंदोलन चालूच ठेवले होते. 

या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांना सदरील दुकानांचे सील काढण्याचे सोमवारी आदेश दिले. त्यानुसार मनपाच्या कर्मचार्‍यांनी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास या दुकानांचे सील काढले. त्यानंतर व्यापार्‍यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. तशी माहिती, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. दरम्यान, दुकानांचे सील काढल्यानंतर व्यापार्‍यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी उपस्थित  होते.

व्यापार्‍यांच्या लढ्याला यशएलबीटी थकबाकीच्या वसुलीला स्थगिती आणल्यानंतर व्यापार्‍यांच्या ज्या चार दुकानांना वसुलीसाठी सील ठोकण्यात आले होते, ते सील काढण्याची मागणी नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्याकडे केली. त्यानंतर जाधव यांनी ही मागणी मान्य करुन याबाबत आयुक्त राहुल रेखावार यांना सील काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपाने सोमवारी सायंकाळी दुकानाचे सील काढले. त्यामुळे व्यापार्‍यांच्या लढ्याला यश आले आहे. यापुढेही व्यापार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. - आ.डॉ.राहुल पाटील 

टॅग्स :parabhaniपरभणीStrikeसंप