शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांनंतर येलदरीत मत्स्य व्यवसायाला मिळाली उभारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 17:41 IST

मराठवाड्यातील सर्वात मोठा मत्स्य व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे़ 

ठळक मुद्देदीड हजाराहून अधिक कुटूंबियांना आधार मिळाला आहे़गोड्या पाण्यातील येलदरीच्या माशांना वेगळे महत्त्व या प्रकल्पातील माशांना देशभरातून मागणी आहे़

येलदरी (परभणी ) : येलदरी प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने या भागातील मत्स्य व्यवसायाला तब्बल ५ वर्षानंतर उभारी मिळाली असून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दीड हजार कुटूंबियांना रोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे़

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात मागील चार-पाच वर्षांपासून समाधानकारक पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसाय अडचणीत आला होता़ या प्रकल्पातील माशांना देशभरातून मागणी आहे़ सर्वसाधारणपणे महाराष्ट्रासह इतर राज्यात खाऱ्या पाण्यातील मासे विक्रीसाठी येतात़ त्यामुळे गोड्या पाण्यातील येलदरीच्या माशांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते़ येथील मत्स्य व्यवसाय वाढीस लागत असतानाच येलदरी धरणातील पाणीसाठ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत होती़ मागील ४ ते ५ वर्षांपासून या प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा झाल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडला होता़ 

यावर्षीच्या पावसाळ्याच्या अखेरीसही धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा झाल्याने हे वर्षही  दुष्काळी जाते की काय? अशी शंका वाटत असतानाच १५ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाने जोर धरला़ परिणामी येलदरी प्रकल्पात ९९ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे़ या प्रकल्पात झालेल्या पाणीसाठ्यामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठा मत्स्य व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे़ 

या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दीड हजाराहून अधिक कुटूंबियांना आधार मिळाला आहे़ येलदरी प्रकल्पात झालेला समाधानकारक पाणीसाठा लक्षात घेता राज्य शासनाच्या मत्स्यसंवर्धन विभागानेही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज सोडून या व्यवसायाला अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

प्रथमच विकसित केला प्रॉन्सयेलदरी येथील प्रकल्पामध्ये ३-४ वर्षापूर्वी प्रथमच प्रॉन्स मासा विकसित करण्यात आला़ या माशालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ बाजारपेठेत प्रॉन्स माशामुळे मोठी उलाढाल होऊन मत्स्य व्यावसायिकांना आर्थिक लाभही झाला होता़ प्रॉन्सबरोबरच या प्रकल्पामधील झिंग्यालाही मोठी मागणी असून, यावर्षी जलसाठा झाल्याने या दोन्ही माशांचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

मत्स्य व्यवसाय होता अडचणीतयेलदरी प्रकल्पामध्ये दरवर्षी पाणीसाठा खालावत असल्याने या प्रकल्पातील माशांचे प्रमाण कमी झाले होते़ त्यामुळे देशभरात मागणी असलेले गोड्या पाण्यातील मासे शिल्लक राहतात की नाही? अशी शंका निर्माण झाली होती़आता धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यामुळे मत्स्य व्यवसायाला वाव मिळाला असून, गोड्या पाण्यातील मासे पुन्हा एकदा राज्यासह देशभरातील बाजारपेठेत उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे़ 

प्रकल्पात मिळणारे मासेयेलदरी येथील जलाशयात विविध जातींच्या माशांचे उत्पादन केले जाते़ त्यामध्ये कतला, मरळ, चिलापी, बाम, मिरगल, शेंगट, काळूशी, राहू, सुपरनस, वामट या नैसर्गिक गावरान माशांनाही ग्राहकांची मागणी आहे़ त्यामुळे  झिंग्याबरोबरच नैसर्गिक गावरान माशांचेही उत्पादन या जलाशयातून घेतले जाणार आहे़ 

टॅग्स :fishermanमच्छीमारparabhaniपरभणीDamधरणdam tourismधरण पर्यटन