शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट खत विक्रीप्रकरणी पाच जणाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 18:47 IST

कंपनीने आठ दिवसांपूर्वी केलेल्या खुलासा समाधानकारक नसल्याने कृषी विभागाकडून गुन्हा दाखल

ठळक मुद्दे ४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष तमशेटे यांच्याकडूनही गुन्हा दाखल

मानवत : निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणा विरोधात कृषी विभागाने १३ सप्टेंबर गुन्हा नोंदविला आहे. विशेष बाब म्हणजे आठ दिवसापूर्वीच याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात कृषी विभागाने गुन्हा नोंद केला आहे.

मानवत कृषी विभागाच्या पथकाने ५ मे २०१९ रोजी शहरातील गणेश अग्रो एजन्सी या दुकानाची तपासणी केली होती. या दुकानात गोवा राज्यातील झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे सिंगल सुपर फास्फेट (दाणेदार) खत विक्री करण्यासाठी ठेवण्यात आला होता.यावेळी खताचे पथकाने नमुने घेऊन सदर नमुने औरंगाबाद येथे खत चाचणी प्रयोगशाळेत पाठविले होते.प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हे नमुने अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्याने कृषी विभागाने उत्पादक कंपनीला निकृष्ट दर्जाचे खत उत्पादन ,वितरण व विक्री केल्याप्रकरणी कारणे द्या नोटीस बजावुन खुलासा मागवला होता.

या प्रकरणी कंपनीने आठ दिवसांपूर्वी केलेल्या खुलासा समाधानकारक नसल्या कारणाने येथील तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक पी.एच.कच्छवे यांनी १३ सप्टेंबर रोजी झुआरी कंपनीचे व्यवस्थापक गजानन जयराम कवट यांच्यासह कंपनीचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ व व्यवस्थापकाविरोधात विरोधात महाराष्ट्र अत्यावश्यक वस्तू अधिनियमनुसार शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.विशेष बाब म्हणजे ४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष तमशेटे यांनी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात निकृष्ट खत विक्रीप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र