शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:31 IST

जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५ कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वितरित केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती: जिल्हा परिषदेचे रस्ते

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५ कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वितरित केला आहे.जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी जि.प.ने जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने ५५ रस्त्यांच्या कामांची यादी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यानुसार या यादीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत तब्बल ५ कोटी ३४ कोटी ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वर्ग करण्यात आला आहे. या निधीमधून ब्राह्मणवाडी ते नांदगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी ११ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून राज्यमार्ग २४८ ते झरी-मिर्झापूर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठीही ११ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संबर - आनंदवाडी, आंबेटाकळी- दामपुरी, ताडकळस ते माखणी, राज्य मार्ग २२१ पासून विटा-लासीना- थडी उक्कडगाव- लोहीग्राम- शिर्शी जिल्हा मार्ग सीमा, प्र.जि.मा. १८ ते मानकादेवी तालुका सरहद्द, आनंदवाडी ते वाघदरी या सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी प्रत्येकी ११ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.प्र.जि.मा.३१ ते वडगाव इक्कर, परभणी शहर ते वांगी रस्ता, हिवरा बु. धोत्रा ते जिल्हा सीमा, जोडरस्ता बाणेगाव ते ताडकळस, राज्यमार्ग ६१ ते नाथरा वस्ती, रेणापूर ते इटाळी, जोडरस्ता मसला तांडा, इजिमा १, राणीसावरगाव ते राणीसावरगाव पाटी- पाळोदी, राज्य मार्ग २२१ पासून उखळी बु. ते भूक्तारवाडी, प्रजिमा ३ ते क्वॉटन सेंटर ते चारठाणा, प्ररामा २ ते मालेगाव, अंगलगाव ते मुरुमखेडा, जोडरस्ता म्हाळसापूर, मोरेगाव-ब्राह्मणगाव-सोनवटी, जोडरस्ता डिग्रसवाडी ता. सेलू, राज्यमार्ग २४८ ते धारासूर प्रजिमा २१, खादगाव पाटी ते खादगाव रस्ता, जोडरस्ता पिंपरी ते इरळद, राज्यमार्ग २३४ ते अकोली - इसाद, पिंपळगाव ते तांबुळगाव (ता.पालम), जोडरस्ता सावंगी भूजबळ प्रजिमा ३५, राज्यमार्ग २३५ ते जोडरस्ता मोजमाबाद तांडा, इजिमा १७ ते जोडरस्ता कांदलगाव या सर्व रस्त्यांसाठी प्रत्येकी ६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. टाकळगव्हाण- झाडगाव, राज्यमार्ग ६१ ते वडगाव सुक्रे ते सूरपिंपरी राज्यमार्ग २४८ ते तरोडा, जांब- सोन्ना, जोड रस्ता सुरवाडी, टाकळगव्हाण ते सारोळा, मानवत- उक्कलगाव- इटाळी ते तालुका सीमा, राणीसावरगाव ते गुंजेगाव या सर्व रस्त्यांसाठी ४ लाख ९० हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यमार्ग २४९ ते सातेगाव, प्ररामा १६ ते निळा या रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्यमार्ग ६१ ते वरखेडा या रस्त्यासाठी १३ लाख ५० हजार तर जोडरस्ता आटुळा, प्रजिमा २ ते बेलोरा या रस्त्यांसाठी १३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बोरी- करवली सिमेंट रस्त्यासाठी ३८ लाख ७५ हजार रुपये तर गोगलगाव ते पाटी आंबेगाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २४ लाख आणि सेलू ते निपाणी टाकळी रस्त्याच्या कामासाठी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याशिवाय प्रजिमा ८ पासून जोडरस्ता चिंचोली दराडे यासाठी २० लाख ७५ हजार, जोडरस्ता वाघी बोबडेसाठी ९ लाख ८० हजार, बोरी-करवली रस्त्यासाठी ८ लाख, जोगवाडा- जिंतूर- घेवंडा रस्त्यासाठी ८ लाख ७५ हजार आणि सावरगाव ते प्रजिमा ३५ ता. मानवत या रस्त्यासाठी १४ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.