शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आधी मराठा आरक्षण,नंतर शासकीय कार्यक्रम; दोन गावांत आंदोलकांनी भारत संकल्प यात्रा थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 17:43 IST

शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दररोज दोन गावात कार्यक्रम घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

पाथरी : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे, 24 डिसेंबर पर्यन्त ठीक ठिकाणी लाक्षणिक उपोषण केले जात आहेत. त्यात तालुक्यात आजपासून गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेचे रथ शासकीय माहिती देण्यासाठी दाखल होत आहे. मात्र, आज तालुक्यातील हदगाव बु आणि खेरडा येथे दाखल झालेल रथ आधी मराठा आरक्षण,नंतर शासकीय कार्यक्रम, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी विरोध केल्याने प्रशासनाला परत आणावे लागले. विशेष म्हणजे, खेरडा गावात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी कार्यक्रम  बंद कारण्यास प्रशासनाला भाग पाडले. 

केंद्र शासनाच्या वतीने गावा गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरवला जात आहे. शनिवारी पाथरी तालुक्यात या रथाची सुरुवात सकाळी 9 वाजता खेरडा येथून झाली. सकाळी रथ गावात येताच गावकऱ्यांनी स्वागत केले.  रथामधून माहिती देण्यास सुरुवात ही झाली. त्याचवेळी गावातील मराठा आंदोलक आणि गावकरी जमा होऊन अधिकाऱ्यांना निवेदन देत आम्हाला शासकीय योजना माहिती आहे त्यांचा लाभ ही होतो मात्र आता आरक्षण मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कार्यक्रम नको, अशी भूमिका घेतल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर हाच रथ दुपारी 2 वाजता हदगाव बु येथे पोहचला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. मात्र, येथेही आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन कार्यक्रम थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे येथील कार्यक्रमही रद्द करावा लागला आहे. 

आंदोलकांच्या निवेदानानंतर रद्द दोन्ही गावात आंदोलक यांनी निवेदन देऊन कार्यक्रम थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला.  - ईश्वर पवार, गटविकास अधिकारी, पाथरी 

रोज दोन ठिकाणी कार्यक्रम शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दररोज दोन गावात कार्यक्रम घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी ड्रोन कॅमेराद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या दिवशीच असा अनुभव आल्याने पुढील काळात या रथाबाबत काय घडामोडी घडतात याकडे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार