शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत टँकर चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:39 IST

टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने लावलेल्या टँकर्सपैकी एका टँकर चालकाने परस्पर पाण्याची विक्री केल्याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने लावलेल्या टँकर्सपैकी एका टँकर चालकाने परस्पर पाण्याची विक्री केल्याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने शाकेर मुसा पटेल यांच्या एजन्सीचे ४४ वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. या वाहनांवर जीपीएस यंत्रणाही आहे. टँकरचालकांना पाणी वाटप करण्यासाठी पॉर्इंट निश्चित करुन दिले आहेत. त्या पॉर्इंटवरच टँकरने पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र सोमवारी यापैकी एका टँकरचालकाने परस्पर खाजगी ठिकाणी टँकरने नेऊन पाण्याची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.मनपाचे शहर अभियंता वसीम खान वाजीद खान पठाण यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास टँकर क्र.एम.एच.२२/एन २०५८ या टँकरमध्ये एमआयडीसी येथील जलकुंभावरुन पाणी भरण्यात आले. टँकर चालक कैलास रंगनाथ धायतिडक (रा.आंबेटाकळी) यास दत्तधाम परिसरात पाणी वाटप करण्यास सांगितले होते. मात्र टँकर चालक कैलास धायतिडक याने हे टँकर रात्री ८ वाजेपर्यंत जागीच थांबवून ठेवले.रात्री ८ वाजेनंतर दत्तधामजवळील जीवन संस्कार वसतिगृहात हे पाणी विक्री केले. या संदर्भातील माहिती अक्षय देशमुख यांनी फोनवरुन दिल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता टँकर चालक कैलास धायतिडक याने सार्वजनिक ठिकाणी पाणी वाटप न करता स्वत:च्या फायद्यासाठी जीवन संस्कार वसतिगृहाला पाण्याची विक्री केल्याचे स्पष्ट झाले. वसीम पठाण यांच्या या तक्रारीवरुन कैलास धायतिडक याच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी