शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी, मानवत, गंगाखेडमध्ये गुन्हे दाखल; मदरशांना दिलेल्या विकास अनुदानामध्ये केला अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:37 IST

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानात अपहार केल्या प्रकरणी परभणी, मानवत व गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केलेल्या चौकशीत अनुदानात अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानात अपहार केल्या प्रकरणी परभणी, मानवत व गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केलेल्या चौकशीत अनुदानात अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत मदरस्यांच्या विकासकामांसाठी २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील १३ तर व २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४ मदरशांना एकूण ४६ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा विकास निधी देण्यात आला होता. काही ठिकाणी विकास निधीमध्ये अपहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार परभणीत गटशिक्षणधिकारी संतोष राजूरकर यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत परभणी शहरातील पाकिजा मोहल्ला भागातील हजरत सय्यद शाह तुराबूल हक अरबी मदरश्याला ग्रंथालय, संगणक कक्ष व मानधनासाठी ३ लाख ६ हजार ४०० रुपये तर शहनाज मोहल्ला भागातील हजरत इब्राहीम अ.सलाम अरबी मदरसा यांना मदरसा इमारतीची डागडुजी, ग्रंथालय, शिक्षक मानधनासाठी २ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. दोन्ही मदरश्यांना आरटीजीएसद्वारे हे अनुदान वितरित करण्यात आले होते. या अनुदानाचा गैरवापर झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना दिले. त्यानुसार पोखर्णी येथील केंद्रप्रमुख व कारेगाव येथील केंद्रप्रमुख यांनी दोन्ही मदरश्यांच्या पत्यावर जावून चौकशी केली असता तेथे हे मदरसे आढळले नाहीत. या मदरश्यांचे अध्यक्ष शेख ताहेर शेख युसूफ (रा.सिद्धार्थनगर, हमालवाडी हिंगोली) व शेख रुखसाना शेख खाजा (रा.पोस्ट आॅफीस जवळ हिंगोली) हे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी संतोष राजूरकर यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शासकीय अनुदानाचा अपहार केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपी शेख ताहेर व शेख रुखसाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच मानवत येथे गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी फिर्याद दिली. त्यात जिशान ऐज्युकेश्न अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या दारुल उलूम अनसारुल उलूम या मदरशाला दिलेल्या ३ लाख ९० हजार रुपयांच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी संस्थाध्यक्ष मोहम्मद तकी अन्सारी व स.मुस्तबील स.तैय्यब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरीतही एका व्यक्तीवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते; परंतु याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.गंगाखेडमध्ये गुन्हा दाखलगंगाखेड येथील हसनयन एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या मदरसा बाबुल इल्म अनवारे मोहम्मदी या मदरशाला ३ लाख १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. या अनुदानाचा सदरील संस्थेने दूरुपयोग केला. त्यामुळे या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांच्या फिर्यादीवरुन संस्थाध्यक्ष शेख तसबीह (रा. अकोला, ता.अंबाजोगाई जि.बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाख करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसfundsनिधी