सेलू येथील युनूस शेख उस्मान यांचे कपडे शिवण्याचे मंठा येथे दुकान आहे. १ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास युनूस शेख उस्मान हे (क्र.एमएच २८ एएम २०४१) या दुचाकीवरून सिध्दार्थ रमेश सजलवार यांच्यासोबत मंठा येथून सेलू येथे घरी जात होते. ते तळतुंबा पाटी येथे आले असता पाठीमागून भरघाव वेगाने आलेली दुचाकी त्यांच्यासमोर आली व सदरील दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे शेख यांची दुचाकी त्या दुचाकीवर आदळली. या अपघातात युनूस शेख हे गंभीर जखमी झाले. तर सिध्दार्थ रमेश सजलवार यांचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित वाहनचालकांनी शेख यांना उपचारासाठी सेलू व नंतर परभणी येथे दाखल केले. याबाबत त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अपघातप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST