शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूसदृश साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. संसर्गजन्य तापीने नागरिक त्रस्त आहेत. शहरात जागोजागी पाण्याचे डबके साचले असून, नाल्या तुंबलेल्या आहेत. परिणामी डासांचे प्रमाण वाढून तापीची साथ पसरत आहे. येथील रामकृष्णनगर, भाग्यलक्ष्मीनगर, बँक कॉलनी या भागात तापीच्या रुग्णांची संख्या वाढली असून, या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. तापीची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने धूर फवारणीची मोहीम हाती घेतली. मात्र काही ठिकाणी अर्ध्याच भागात धूर फवारणी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतेची कामेही मनपाने हाती घेतली नसल्याने जागोजागी नाल्या तुंबल्या आहेत. तेव्हा रामकृष्णनगर, भाग्यलक्ष्मीनगर आणि परिसरातील संपूर्ण वसाहतींमध्ये धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
रामकृष्णनगर परिसरात वाढले तापीचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST