कार्यालयाच्या भिंती थुंकल्याने रंगल्या
देवगांवफाटा: सेलू शहरातील अनेक शासकीय कार्यालयात कर्मचारी ,नागरिक हे पान खाऊन व धुम्रपान करून कोपऱ्यात थुंकतात. त्यामुळे भिंती रंगल्याचे चित्र दिसत असुन नागरीकांंनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने अस्वस्थता निर्माण होत आहे.
विजेचा लंपडाव बनला डोकेदुखी
देवगांवफाटा: विज उपकेंद्रातुन होणारा विजपुरवठा मागील चार दिवसापासून वारंवार खंडीत होत आहे. या विजेच्या लपंडावाला नागरीक वैतागून गेले आहेत.महावितरण ने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दामिनी पथकाची गरज.
देवगांवफाटा: कोवीडच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून शाळा महाविद्यालय बंद होती.परंतु अनलाँक प्रक्रियेनंतर २३ नोव्हेंबर पासुन ९ ते १२ वी व त्यानंतर २७ जानेवारी पासुन ५ ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. सेलू शहरात विद्यार्थीनीच्या सुरक्षीततेसाठी चिडीमार व दामीनी पथकाची गरज निर्माण झाली आहे.