शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीसाठी पूर्णायेथील शेतक-यांचे सरणावर बसून उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:45 IST

राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे लेखी हमीपत्र दिले. मात्र संपूर्ण कर्जमाफी शिवाय उपोषण माघारी नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे लेखी हमीपत्र दिले. मात्र संपूर्ण कर्जमाफी शिवाय उपोषण माघारी नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मुख्य मागण्यासाठी पूर्णा तालूक्यातील पांगरा ढोणे येथील शेतकरी तूकाराम ढोणे आणि निळा येथील माणिकराव सुर्यवंशी हे बुधवारपासून उपोषण करत आहेत. दोघेही उपोषणासाठी पांगरा शिवारातील गट नं २६५ मध्ये  बोंडअळीने बाधीत कापूस पिकात लाकडाच्या सरणावर उपोषण करत आहेत. याची माहिती मिळताच तहसीलदार श्याम मंदनूरकर ,चुडावा पोलीस ठाणेदार मीना कर्डक, यांनी उपोषणार्थ्यांची भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने दोन्ही शेतक-यांना तुमच्या मागण्या जिल्हाधिका-यांना यांना कळवल्या असून उपोषण मागे घेण्या बाबत लेखी पत्र दिले. परंतु; जो पर्यंत राज्य शासन शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करणार नाही तोपर्यत उपोषण चालूच राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. यासोबतच आज पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष शहाजी देसाई, संचालक गजानन धवन, सहकार अधिकारी श्याम कुलकर्णी, शिवाजी डाखोरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली.

संपूर्ण कर्जमाफी हवीमराठवाड्यातील शेती व्यवसायाची स्तिथी अतिशय बिकट आहे सम्पूर्ण कर्जमाफी शिवाय शेतकऱ्याची आर्थिक घडी सुधारू शकणार नाही. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी चा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शहाजी देसाईं यांनी व्यक्त केली

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी