शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अग्रिम पीकविम्यासाठी मानवतच्या शेतकऱ्यांनी केले मुंडन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:18 IST

मानवत तालुक्यातील चार ही महसूल मंडळाचा अग्रीम पीकविमा देण्याची मागणी

- सत्यशील धबडगे मानवत: शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा द्यावा या मागणीसाठी मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज दुपारी तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर मुंडन आंदोलन करून लक्ष वेधले. पावसा अभावी पिके हातातून गेली असल्याने शेतकऱ्यांना अग्रिम विमा देऊन दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी केली.

मानवत तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिके वाया गेलेली आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाचा २१ दिवसाचा खंड पडूनही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना अग्रीम देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. सातत्याने मागणी करूनही कंपनी अग्रिम विमा देत नसल्याने शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मुंडन करून प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. तहसीलदार पल्लवी टेमकर, तालुका कृषी अधिकारी जी. ए. कोरेवाड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद मदनराव घाडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव काळे, बीआरएसचे  बालासाहेब आळणे, बाजार समितीचे संचालक कृष्णा शिंदे, विशाल यादव, अमोल कदम, मनसेचे दत्तराव शिंदे, माकप किसान सभेचे अध्यक्ष लिंबाजी कचरे, माधव नाणेकर, बीआरएस तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, प्रा. प्रकाश भोसले, रामप्रसाद निर्मळ, संतोष जाधव, माणिक सोन्नेकर, उक्कलगाव सरपंच दादा गायकवाड, आदी शेतकरी  आंदोलनात सहभागी झाले होते. 

दहा शेतकऱ्यांनी केले मुंडनमानवत तालुक्यातील केकर जवळा, कोल्हा रामपुरी मानवत या चारही महसूल मंडळाचा अग्रिम पीकविमा देण्याच्या यादीत समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज आक्रमक आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर १०  शेतकऱ्यांनी मुंडन करून मागण्यांकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी