शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:21 IST

रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

परभणी : रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातील शेतकरी परभणीत दाखल झाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालयाच्या सांख्यिकी विभागाने पीक विम्याचा घटक मंडळ ऐवज तालुका गृहित धरल्याने जिल्ह्याचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या अविश्वासामुळे क्षेत्रसुधार गुणांक  लावल्याने ५४ कोटी २४ लाख ४२ हजार ३०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. 

पीक कापणी प्रयोगात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने हलगर्जीपणा केला. तर रिलायन्स पीक विमा कंपनीने बेकायदेशीररित्या हस्तक्षेप करुन कृषी विभागाने दिलेले आकडे न मानता मनमानी पद्धतीने निर्धारित उत्पन्नाच्या आकड्यांचा आधार घेऊन ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांचे नुकसान केले. 

या सर्व प्रकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०५ कोटी ८० लाख ३ हजार ५६८ रुपयांची फसवणूक शासनाने केली आहे. त्यापैकी १४ महसूल मंडळातील ९० हजार शेतकऱ्यांची ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांची फसवणूक विमा कंपनीकडून झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणात आंदोलनकर्त्यांकडून पुरावेही सादर करण्यात आले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या नुकसानी प्रकरणी जिल्हा प्रशासन रिलायन्स कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या आंदोलकांमार्फत करण्यात आली. जि.प.सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर, उद्धवराव काळे यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी