शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:42 IST

सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीचा गोंधळामुळे तालुक्यातील दहेगाव येथे एका ३० वर्षीय शेतकऱ्याने रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले.

जिंतूर (परभणी ) : सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीचा गोंधळामुळे तालुक्यातील दहेगाव येथे एका ३० वर्षीय शेतकऱ्याने रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. अशोक एकनाथ ढोणे असे शेतकऱ्याचे नाव असून आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दहेगाव ( ढोणे ) येथे राहणारे अशोक एकनाथ ढोणे हे आपल्या वडिलोपार्जित शेतीवर मेहनत करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने उधारी उसनवारी तसेच खाजगी कर्ज घेऊन शेतात पेरणी केली होती मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे ऐन जोमात असलेली पिके सुकत असल्याने हाता तोंडाशी घास हिरावला जातो की काय याच विवंचनेत ढोणे असत. 

यातच त्यांच्या आई व वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेतीवर घेतलेले कर्ज होते हे कर्जमाफ होईल व नवीन कर्ज मिळेल या आशेवर असतांना अजूनही कर्ज माफी झाली नाही.यामुळेही ते निराश होते. यामुळे आपल्या कुटुंचा उदरनिर्वाह कसा चालवावा याच विवनचतेत त्यांनी रविवारी रात्री रात्री १  वाजेच्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. 

ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच ढोणे यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गावातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीbankबँक