शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
7
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
8
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
9
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
10
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
11
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
12
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
14
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
15
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
16
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
17
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
18
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
19
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
20
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान नगरसेवक सुरक्षित प्रभागाच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST

गंगाखेड नगर परिषदेची मुद्दत चालू वर्षाअखेर संपणार आहे. तसेच पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण ...

गंगाखेड नगर परिषदेची मुद्दत चालू वर्षाअखेर संपणार आहे. तसेच पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०१६ मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच वर्ष शहरातील विकास कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव करत आगामी नगर परिषदेच्या निवडणूक मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचे चित्र राजकीय पटलावर होणाऱ्या हालचालीवरून पहावयास मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून आणि संयुक्त प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. मात्र आता नगर परिषदेच्या निवडणुका जुन्या पद्धतीच्या वॉर्ड रचनेतून होणार असल्याचे तसेच नगराध्यक्ष पद ही नगरसेवकांतून निवडल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले हवसे, गवसे, नवसे आतापासूनच कामाला लागल्याचे दिसत आहे. गत निवडणुकीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी प्रभागातील साध्या समस्या सोडविल्या नसल्याचे खुद्द मतदारच बोलून दाखवत आहेत. सद्य:स्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात असलेल्या काही विद्यमान नगरसेवकांनी आपल्या सोयीचे सुरक्षित वॉर्ड शोधायला सुरुवात केल्याचे ही पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील राजकीय पक्षात कोणाकडे कार्यकर्त्यांचा तर कोणाकडे उमेदवारांचा अभाव असल्याने याची जुळवा जुळव करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून, आयाराम, गयारामची या पक्षातून त्या पक्षात आवक-जावक ही सुरू झाल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीतील नेत्याचे एकमत होणार का?

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रासपा आदी राजकीय पक्षांनी बारा प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. यात गंगाखेडनगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजयकुमार तापडिया थेट जनतेतून निवडून आले होते, तर नगरसेवक म्हणून त्यांच्या काँग्रेस पक्षाचे ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ६, भाजपचे ४, रासपाचे ३, शिवसेनेचे २ नगरसेवक व अपक्ष १ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस, रासपा, शिवसेना या पक्षात पुढे बेबनाव झाल्याने रासपाच्या उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव पारित झाल्याने रासपाच्या उपनगराध्यक्षांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतरच्या घडामोडीत उपनगराध्यक्ष पद काँगेसच्याच पारड्यात पडले होते. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याची सत्ता मिळविल्याने राज्यात या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीची ताकद वाढलेली दिसत असली तरी गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत होईल हे सांगणे कठीण आहे.