शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! शेतात गेलेल्या बापलेकीचा मृतदेह आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 17:52 IST

शेतातील विहिरीजवळ मोबाईल आणि चप्पल आढळून आले

ठळक मुद्देपालम तालुक्यातील गणेशवाडी येथील घटना

पालम ( परभणी ) : शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या  बापलेकीचा मृतदेह 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता पालम तालुक्यातील गणेशवाडी शिवारात आढळून आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी दिली.

पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील शेतकरी नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय 40 वर्ष) त्यांची मुलगी वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय 14 ) असे मयत यांची नावे आहेत. ते दोघेही 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शेतातील आखाड्यावर बैलांना चारा टाकण्यासाठी गेले होते. ते परतले नसल्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा शेतातील विहिरीजवळ नागनाथ बल्लोरे यांचा मोबाईल आणि चप्पल आढळून आले. विहिरीत पाहणी केली मात्र 60 फूट पाणी असल्याने अंदाज लागत नव्हता. आज पाच मोटारी लावून विहिरीचे पाणी उपसण्यात आले. दरम्यान, दुपारी एक वाजता नागनाथ बल्लोरे व वैष्णवी बल्लोरे यांचा मृतदेह दिसून आला. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आले आहेत. अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद पालम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद साने करत आहेत. 

हेही वाचा - कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती

घटनास्थळी रात्री पोलिसांची धावगणेशवाडी येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद साने यांनी 12 सप्टेंबर रोजी रात्री घटनास्थळी धाव घेतली होती. ते बराच वेळ घटनास्थळी होते. परंतु विहिरीतील पाण्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप वेळ लागला.

हेही वाचा - आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीDeathमृत्यू