शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

बेडरूममध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By मारोती जुंबडे | Updated: August 9, 2023 18:35 IST

घटनेमागील कारण अस्पष्ट; दोन महिन्यात दूसरी घटना

पालम: एका दांपत्याच्या आत्महत्येला तिन महिनेही लोटले नसताना पुन्हा एकदा नाव्हलगावातच (ता.पालम, जि.परभणी) अशाच घटनेची पुनर्रावृत्ती झाली. त्यात पत्नीचा मृतदेह पलंगावर अढळून आला असून पतीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या मागील कारण समजू शकले नाही.

नाव्हलगाव येथील भरत नवनाथ शिंदे (२५) हे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी होते. ते पत्नी जया भरत शिंदे (२२) यांच्यासह कुटुंबापेक्षा वेगळे राहत होते. नेहमीप्रमाणे रात्री ते मंगळवारी दरवाजा लावून झोपी गेले. त्यांच्या घराचा दरवाजा बुधवारी सकाळी १० वाजले तरीही उघडला नव्हता. म्हणून शंका आल्याने नातेवाईकांनी खिडकीवर चढून आत डोकावून पाहिले. तेव्हा विदारक चित्र समोर दिसले. त्यात घरातील पलंगावर जया शिंदे ही मृतावस्थेत होती. तर बाजूला छताला दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत भरत शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. 

लागलीच घरातील मंडळींनी पालम पोलिस ठाण्यास घटनेची कल्पना दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दिपक टिपरसे, पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाढ, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी करण्यासाठी सदर मृतदेह पालम ग्रामीण रूग्णालयात पाठवून दिले. घटनेमुळे नाव्हलगावात शोककळा पसरली आहे.

घटनेमागील कारण अस्पष्टनाव्हलगावातील या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नाही. पत्नी पलंगावर मृतावस्थेत आढळून आली. शिवाय, शेजारीच किटकनाशकाची बॉटल पडली होती. त्यामुळे तिचा मृत्यू विष पिल्याने झाला असावा, असे पोलिसांना वाटते. त्यानंतर पतीने आत्महत्या केली, हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तरीही दोघांनी सहमतीने जिवनयात्र संपविली का? घातपात आहे, हे पोलीस तपासानंतरच कळेल. तत्पूर्वी उत्तरीय तपासणीमध्ये मृत्यूचे कारण लक्षात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी दिली.

दोन महिन्यात दूसरी घटनानाव्हलगावात २२ मे रोजी अशाची घटना घडली होती. तेव्हा सुधाकर रंगनाथ केडाळे व ज्योती सुधाकर केडाळे (रा.नाव्हा, ता.पालम), या दाम्पत्याने आत्महत्या करून जिवनयात्रा संपविली होती. तेव्हा सहा महिन्याचं तान्हं मुलं आणि अडीच वर्षांची चिमुकली हिला मागे ठेवून या दोघांनी विहीरीत उड्या घेतल्या होत्या. त्यापूर्वी येथे डझनभर लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त गाव म्हणून नाव्हलगावात जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम घेवून मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्याला दोनही महिने लोटत नाही, तोपर्यंत पुन्हा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी