शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा

By विजय पाटील | Updated: January 4, 2025 17:20 IST

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

परभणी : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील आरोपींना पुण्यात कोणी मदत केली, या आरोपींना मदत करणाऱ्या मंत्र्याला कधी मंत्रिमंडळातून हाकलणार, असे सवाल करीत परभणी येथील मोर्चास संबोधित करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक टीका केली. तर हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून १२:३० वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नेतेमंडळी व बीड जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनीही सहभाग नोंदविला. स्थानिकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. आजी-माजी अनेक लोकप्रतिनिधी यात सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी विविध फलके हाती घेऊन ही मंडळी सहभागी झाली होती. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत मान्यवरांची भाषणे झाली.

सर्वांना मकोका लावा : आ. सुरेश धससंगीत दिघोळे ते संतोष देशमुखपर्यंत परळीत किती हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, हे तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीहून माणसे पाठविली पाहिजे. तर धनंजय मुंडे मंत्री राहिले तर हे असेच सुरू राहील. त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकरांना मंत्री करा, कायंदेंना करा, सोळंकेंना करा, असे आधीच अजित पवारांना सांगितले आहे. 

मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे: आ. संदीप क्षीरसागरबीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल होतात. तपास वाल्मीक कराडच्या दिशेने गेला की थांबतो. त्यांच्या काळातले मंत्री त्यांना सांभाळायचे. आताही या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सीडीआर तपासून जे दोषी आढळतील, त्यांना फासावर लटकवले पाहिजे.

चार्जशिटमध्ये त्रुटी राहू नये : खा. संजय जाधवया प्रकरणाचा योग्य तपास करून योग्य चार्जशिट दाखल व्हावी. पुराव्याअभावी यांनी अनेक खून पचवले. त्यामुळे अशा त्रुटी राहिल्या नाही पाहिजे. परळीची स्थिती बिहारला लाजवेल, अशी आहे. राजकीय वरदहस्ताने धाडस वाढत चालले. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. तर ज्याचा खून झाला, त्याच्या भावाला धमकी देण्याची ताकद येते कुठून? समाजात खदखद आहे. ती उफाळणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. परळीसारखीच आमच्या गंगाखेडमध्ये स्थिती आहे. मात्र, त्याला आम्ही आवरू.

...तर मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही : मनोज जरांगेसंतोष देशमुख गेलेत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते म्हणाले की, आपल्या समाजाला त्रास झाला तर तोडीस तोड उत्तर द्यायचे. ते जर माणसांचे मुडदे पाडायला लागले तर पर्याय नाही. 

समाजाने असेच पाठीशी राहावे : वैभवी देशमुखसंतोष देशमुख यांची मुलगी वैभवी यावेळी म्हणाली की, आज मला माझ्या वडिलांचा तो हसरा चेहरा दिसत नाही. त्यांना आमच्यापासून हिरावले. त्यांनी समाजासाठी काम केले. आज समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही येथे आलात. असाच तुमचा हात माझ्या व माझ्या भावाच्या पाठीवर कायम राहू द्या. असेच सोबत राहा.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणparabhaniपरभणीSuresh Dhasसुरेश धसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरSanjay Jadhavसंजय जाधवManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील