पूर्णा येथील बुद्ध विहारात ७ फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बी.आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसगी वसंत पराड हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्यामराव जोगदंड, पू. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते संघरला, विश्वनाथ झोडपे, बाबासाहेब धबाले, अशोक कांबळे, एम.एम. भरणे, प्रकाश कोबळे, उत्तम खंदारे, हर्षवर्धन गायकवाड, मधुकर गायकवाड, दादाराव पंडित, प्रा. राम धबाले, मुकुंद भोळे, राजकुमार सूर्यवंशी, तुषार गायकवाड, श्यामसुंदर काळे, रेखा खर्गखराटे, नीलावती पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना उपस्थितांच्या हस्ते पुष्पसमर्पण करण्यात आले. भदंत उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम ढगे तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले. आभार किशोर ढाकरगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबाराव वाघमारे, एम.यू. खंदारे, ज्ञानोबा जोंधळे, डॉ. तुपसमुंदर, मुंजाजी गायकवाड, आंबादास साबळे, गौतम वाघमारे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अमृत कऱ्हाळे, अतुल गवळी, सुनील खाडे, प्रा. संदीप लोखंडे आदींनी प्रयत्न केले.
माता रमाई यांची प्रेरणा प्रत्येक महिलेने घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST