शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरातील घटना : कारची काच फोडून दीड लाख केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:32 IST

शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौला सय्यद साब चौधरी (वय ६८, रा. खंडोबा गल्ली, नांदेड) या निवृत्ती पोलीस उपअधीक्षकांनी शहरातील दर्गारोडवरील गालिब नगरात गुरुवारी दुपारच्या सुमारास गाडी क्रमांक एम.एच. २६ ए.के. ५६०५ ही कार उभी केली. त्यानंतर ते तेथून निघून गेले;परंतु, तेवढ्याच वेळात गाडीच्या कप्प्यात ठेवलेले रोख १ लाख ४५ हजार रुपये, तीन पासबूक, एक चेकबुक व इतर कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.ही बाब मौला सय्यद साब चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला;परंतु, तेथे कोणीच त्यांना दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी गालिब नगरातून थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनूस पठाण हे करीत आहेत.भर दिवसा दर्गा रोड परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या गाडीत चोरी झाल्याने नागरिकांमध्ये शुक्रवारी दिवसभर चर्चा सुरू होती.

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारMONEYपैसाtheftचोरी