शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

झेडपी शाळेत मुलांना टाका, संपूर्ण कर माफी मिळवा; देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय

By मारोती जुंबडे | Updated: June 2, 2025 16:52 IST

देऊळगाव दुधाटे येथे जिल्हा परिषद शाळेची स्थापना शंभरवर्षांपूर्वी झालेली आहे.

परभणी: पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक अभिनव आणि शिक्षणवर्धक निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीकडून संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे.

देऊळगाव दुधाटे येथे जिल्हा परिषद शाळेची स्थापना शंभरवर्षांपूर्वी झालेली आहे. आज शाळेचे शेकडो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, वकील व शासकीय सेवेत दाखल झाले असून अनेक विद्यार्थी कृषी व कृषी उद्योग क्षेत्रात प्रगतशील शेतकरी म्हणुन ओळखले जातात. या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा विकास साधला आहे. वृक्षारोपण करुन विद्यार्थी व शिक्षक, पालकांनी शाळेचा परिसर हा हिरवाईने नटविला असल्याने शाळेचे सौंदर्य उजळून निघाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने शिक्षणासाठी असलेल्या निधीचा योग्यप्रकारे वापर करुन शाळेत वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरे, पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधने आणि विविध उपक्रमांमुळे शाळेचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. त्यामुळे सध्या या शाळेकडे पालकांचा वाढता कल दिसून येतो. त्यातच आता ग्रामपंचायतीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीकडून संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे.

गावचा शैक्षणिक दृष्टिकोन बदलण्याचे संकेतया निर्णयामुळे गावातील शिक्षणप्रेमी वातावरण अधिक बळकट होणार असून, जिल्हा परिषद शाळांबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. शाळेतील दर्जेदार शिक्षण, संस्कार आणि समाजाभिमुख उपक्रमांमुळे येथून घडणारे विद्यार्थी भविष्यात गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायतीचा दूरदृष्टीचा निर्णयसरपंच ललिताबाई उत्तमराव कांबळे, उपसरपंच डिगांबर दुधाटे, ग्रामविकास अधिकारी विशाल अंभोरे आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी एकमताने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. शिक्षणाच्या प्रसारासाठी व जिल्हा परिषद शाळांप्रती सकारात्मक दृष्टीकोन तयार करण्यासाठी पालकांना करमाफी देण्याचे हे पाऊल निश्चितच स्तुत्य असल्यांचे ग्रामपंचातीचे म्हणणे आहे.

विकासासाठी इतर उत्पन्नाचे पर्यायकरमाफीमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने इतर उत्पन्न स्रोतांचा विचार केला आहे. आठवडी बाजार, व्यापारी संकुलांकडून वसुल होणारे कर, शासनाच्या वित्त आयोगाचा निधी व विविध योजनांमधील सहाय्य या माध्यमातून ग्रामपंचायतीचे नियमित खर्च भागवले जाणार आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा