शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

परभणी लोकसभेची निवडणूक:वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:49 IST

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा राज्यस्तरावरील सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न चांगलाचा प्रभावी ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बाबत झालेली चर्चा मतमोजणीनंतर खरीच असल्याचे अधोरेखीत झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राजकारणात नवखे असलेले हैदराबाद येथील आलमगीर मोहम्मद खान यांनी निवडणूक लढविली. त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा व पाथरी येथे जाहीर सभा घेतल्या. शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात बरीच मेहनत घेतली.प्रचारसभा, रॅली, बैठका आदींच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना साकडे घातले. परिणामी लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात आलमगीर खान यांना बºयापैकी मते मिळाली आहेत. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ७९, परभणी विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ३३५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ३२ हजार ८०६, पाथरी विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ८२९, परतूर विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ७०० आणि घनसावंगी मतदारसंघातून २१ हजार ८५ अशी एकूण १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली.विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा ४२ हजार १९९ मतांनी पराभव केला. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना विजयी मतापेक्षा जवळपास तीनपट जास्तीची मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे स्वप्न वंचित बहुजन आघाडीमुळे पूर्ण होऊ शकले नाही.विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादीच्याच पारंपारिक व्होटबँकेला सुरुंग लावला. त्यामुळे शिवसेनेचा निवडणुकीतील विजय सुकर झाल्याचे पहावयास मिळाले.राजकीय जाणकारांना ‘वंचित’ फॅक्टर कारणीभूत वाटेना४एकीकडे वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीमधीलच काही नेत्यांना वंचित आघाडी पराभवासाठी कारणीभूत वाटत नाही. वंचित बहुजन आघाडी पारंपारिक मते घेणार, याची पूर्व कल्पना होती.४ मग वंचितकडे जाणारी तसेच शिवसेनेकडीच मते राष्ट्रवादीकडे का खेचली गेली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिग्गज नेते व काही कार्यकर्त्यांचे अपयश लपविण्यासाठी वंचितला दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल