मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी मृग नक्षत्रापासुन २३ आँक्टोंबर पर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील यापूर्वी कोरडे पडलेले सर्वच नदी, नाले भरून वाहीले. यामुळे सेलू तालूका पाणीदार झाला आहे. महसुल विभागाच्या माहीती नुसार जुन ते २३ आँक्टोंबर २०२० पर्यंत सरासरी ८३७ मी.मी ओलांडून त्यापेक्षा अधिक म्हणजे १०७४ मी.मी.असा विक्रमी पाऊस झाला आहे. आजमित्तीस सेलू तालुक्यातील १ सिंचन तलाव ,५ पाझर तलाव व ५ गाव तलाव अशा एकुण ११ तलावात ८५ टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे आँक्टोबंर महिन्यापासून या लघुतलावात मत्स्यव्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया झाली असती तर मत्स्यव्यवसायीकांना आर्थिक आधार मिळाला असता. तसेच शासनालाही महसूल प्राप्ती झाली असती. फेब्रुवारी महिना आला तरीही याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. केवळ नियोजनाच्या अभावामुळे हि बाब प्रशासनाकडून दुर्लक्षित राहीली हे प्रकर्षाने समोर आले. त्यामुळे या ११ लघु तलावातील मत्स्य व्यवसायावर आपली उपजीविका भागविणाऱ्या मत्स्य व्यावसायीकांवर केवळ प्रशासनाच्या नियोजनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.
असा आहे तलावातील पाणीसाठा
उपविभागीय जलसंधारण कार्यायलाच्या माहीतीनुसार सि़चन तलाव- नरसापुर तलावात ५९४ टि.सी.एम.(१०० टक्के),पाझर तलाव : देवगांव २७८ टिसीएम (९६),प्रिंपरी बु. २६१ टिसीएम (१००),गिरगांव १८४ टिसीएम (८५),तांदुळवाडी १७४टिसीएम (७५),वालूर १६ टिसीएम (२५)
तसेच गाव तलाव : हादगांव खु.१९ टिसीएम (८८),तांदूळवाडी ३८ टिसीएम (८६),गिरगांव ३४ टिसीएम (८९),नरसापुर २८ टिसीएम (८७),आरसड सांवगी २० टिसीएम (८५ टक्के)प्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे.
रिक्त पदामुळे कामे संथगतीने
जिंतुर उपविभागात जिंतूर ,सेलू, पाथरी व मानवत अशा चार तालुक्याचा सामावेश आहे. येथे एक उपविभागीय अधिकारी व पाच कनिष्ठ अभियंता असे सहा पदे मंजूर असतांना केळव एकच कनिष्ठ अभियंता कार्यरत आहे. चार कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त आहेत. तर परभणी येथील शाखा अभियंता टि.के.मुरकुटे यांचेकडे येथील उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे.त्यामुळे या विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. परीणामी कामाची गती मंदावली असल्याचे दिसुन येत आहे.